Ad will apear here
Next
‘‘जीआयबीएफ’मुळे स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी’
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन
बिझनेस एक्सलन्स पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अफगाणिस्तानचे काउन्सिल जनरल नदीम शेरीफी, इराकचे काउन्सिल जनरल ए. एम. अलीखानी, शाहू महाराज, इथोपियाचे काउन्सिल जनरल दमेके अम्बुली व ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी

पुणे : ‘स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) एक चांगले व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा उपयोग करून घेऊन आपल्या उद्योगांच्या कक्षा विस्तारत जागतिक व्यापार करण्यावर उद्योजकांनी भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा ‘बिझनेस एक्सलन्स पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, अफगाणिस्तान काउन्सिल जनरल नदीम शेरीफी, इराकचे काउन्सिल जनरल ए. एम. अलीखानी, इथोपियाचे काउन्सिल जनरल दमेके अम्बुली उपस्थित होते. 

शाहू महाराज म्हणाले, ‘इराण, अफगाण यांचे भारताशी जुने व्यापारी संबंध आहेत. अनेक मुस्लिम राजांनी स्वातंत्र्यानंतर हे संबंध आणखी वृद्धिंगत केले. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत चांगली संधी आहे. याचा स्थानिक उद्योजकांनी लाभ घ्यावा.’

नदीम शेरीफी म्हणाले, ‘अफगाणिस्तान व भारताचे व्यापार व उद्योगातील योगदान मोठे आहे. फोरमचे जगातील आणि देशातील व्यापारी संघटनेशी सामंजस्य करार आहेत. त्याचा फायदा सर्वच उद्योजक, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात होतो. अफगाणातील ड्रायफ्रूट भारताकडून आयात केले जातात, तर अफगाणकडून मसाल्यांची आयात होते.’

ए. एम. अलीखानी यांनी भारत सध्या अन्य देशांशी व्यापारविषयक करार करण्यात आघाडीवर आहे. त्यांचा फायदा स्थानिक उद्योजकांना होणार असल्याचे सांगितले. दमेके अम्बुली यांनीही ग्लोबल फोरमचा उद्योगांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

डॉ. जितेंद्र जोशी प्रास्ताविकात म्हणाले, ‘मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट अभियानामुळे भारतासह परदेशातील कंपन्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, केमिकल, औषध, इलेक्ट्रॉनिक, अवजड उद्योगांतील, क्षेत्रांना जागतिक पातळीवर नेण्याचा मानस आहे. फोरमचे ३७ देशांमध्ये ५३ हजार सभासद असल्याने जागतिक बाजारपेठेत भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRKCE
Similar Posts
‘जीआयबीएफ’तर्फे उद्योजकांचा ११ मे रोजी सन्मान पुणे : आपल्या उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमची (जीआयबीएफ) स्थापना केली आहे. ‘जीआयबीएफ’मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशांतील उद्योजक जोडले जात असून, उद्योगांच्या जागतिक विस्तारासाठी हे उपयुक्त ठरत आहे. उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेत
‘भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानातील व्यवसायसंधींचा लाभ घ्यावा’ पुणे : ‘जगभरातील व्यापाराच्या संधींचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. सर्व प्रकारच्या उद्योगांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी डॉ. जितेंद्र जोशी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे’, असे मत शिवसेनेच्या
‘अभि चॅरिटेबल’तर्फे रक्तदान, अवयवदान जागृती शिबीर पुणे : सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेल्या अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान व अवयवदान जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बाणेर येथील अभि ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात आले. पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली
‘संत विचारांपासून दूर गेल्यानेच दुष्ट प्रवृत्ती वाढली’ पुणे : ‘संत कमी शब्दांत बरेच काही सांगून जातात. त्यांच्या साहित्याचा, वचनांचा आणि विचारांचा प्रभाव खूप मोठा असतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांनी त्यांच्या विचारांनी बराच काळ माणसातील पशूप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language